श्रीवर्धन-पनवेल बससेवा होणार सुरु

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन-पनवेल-श्रीवर्धन बससेवा 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. यादव गवळी समाज संघटना नवी मुंबई-पनवेल यांच्या माध्यमातून 23 सप्टेंबर रोजी संघटनेचे अध्यक्ष नरेश साबळे यांनी श्रीवर्धन आगार प्रमुख महिबूब मणेर यांची भेट घेऊन दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन श्रीवर्धन ते पनवेल आणि पुन्हा श्रीवर्धन अशी एस.टी.ची बससेवा सुरु व्हावी यासाठी मागणी केली होती. त्यानुसार सदर बस हि येत्या 1 ऑक्टोबरपासून शिवशाही बस सुरु करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले आहे. सदरची शिवशाही बस श्रीवर्धनहून दुपारी 3.00 वा. सुटेल आणि परतीच्या प्रवासासाठी पनवेलहून रात्री 10 वाजता श्रीवर्धनसाठी सुटेल. जास्तीत जास्त प्रवाशांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष गणेश साबळे, उपाध्यक्ष नरेश काते, सचिव अनिल काते, खजिनदार सुनील लटके, सल्लागार सुहास महागांवकर, नामदेव साबळे, मोहन लाड, संतोष मिरगळ, रुपेश महाडिक, प्रमोद साबळे उपस्थित होते.

Exit mobile version