श्रीवर्धन-पुणे प्रवासाला साडेआठ तास

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन आगाराच्या शिवशाही बस बाबतीत वाढत्या तक्रारी असून, आगाराकडून या बाबतीत कोणतीही दखल घेतली जात नाही. आगाराचे प्रवासी वर्गाकडे होणारे दुर्लक्ष याचा मनस्ताप श्रीवर्धन-पुणे मार्गावरील शिवशाही बसच्या प्रवासी वर्गाला झाला आहे.

रविवारी (दि.10) श्रीवर्धन आगाराची दुपारी दोन वाजता गोरेगाव मार्गे पुणे येथे मार्गस्थ होणाऱ्या शिवशाही बसचा त्रासदायक अनुभव प्रवासी वर्गाने घेतला आहे. बस स्थानकातून मार्गस्थ झाल्यावर अत्यंत धीम्या गतीने प्रवास सुरू असल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली. त्यातही बस मधील वातानुकूलित यंत्रणा बंद अवस्थेत, काचावरील दुर्गंधी युक्त पडदे त्यातच नादुरुस्त व फाटकी पुश बॅक आसने याचा मनस्ताप बसमधील पंचेचाळीस प्रवाशांना सहन करावा लागला.
श्रीवर्धन स्थानकातून दुपारी दोन वाजता पुणे येथे मार्गस्थ होणारी बस साधारणपणे सायंकाळी साडेसात वाजता स्वारगेट येथे दाखल होते.

या शिवशाही बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहानमुले होती. आम्ही कंट्रोल रूम व स्थानकात फोन केला. उडवाउडवीची उत्तर दिली. नादुरूस्त व धीम्या बसचा आम्हाला त्रास झाला. या मार्गावर साधी बस सुरू करावी.

जगदीश पाडलेकर
Exit mobile version