श्रीवर्धन तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

पोलीस प्रशासनाची मवाळ भूमिका

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुका पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची जन्मभूमी असून हा तालुका शांतता प्रिय आहे. परंतु, येथील काही राजकीय पक्षांनी पोसलेले गावगुंड तालुक्यात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, आत्ताच्या काही नवीन घटनांमुळे श्रीवर्धन तालुका संघटित गुन्हेगारीच्या विळख्यात जात असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही पोलीस प्रशासनकाडून मवाळ भूमिका घेतीली जात असल्याने स्थानिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सध्या श्रीवर्धन तालुका पर्यटनासाठी पसंतीचे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध विकास कामे देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परंतु, या ठिकाणी बाहेरून काम करण्यासाठी येणारे ठेकेदार व व्यावसायिकांना गावगुंडांकडून वेळोवेळी दमबाजी व शिवीगाळ करून धमकावण्याचे प्रकार वाढत आहेत. हप्ता किंवा खंडणीसाठी असे प्रकार घडताना दिसत आहे. यामध्ये आता महिलांना देखील पुढे करण्यात येत असून त्यामध्ये ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार देखील घडत आहेत. त्यासाठी अनेक आस्थापनांमध्ये जाऊन दमबाजी, मारहाण करण्यापर्यंतच्या घटना देखील घडत आहेत. मात्र, या सगळ्या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाकडून अत्यंत मवाळ भूमिका घेतली जात आहे. एखाद्या व्यक्तीला गंभीर स्वरूपाची मारहाण होईपर्यंत गावगुंडांकडून मारहाण करण्यात येते. पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांकडून अशा गावगुंडांना अभय मिळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील काही राजकीय पक्षांचे तथाकथित नेते अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी कार्य तत्परतेने पुढे असतात, असे स्थानिकांमधून बोलले जता आहे.

Exit mobile version