शुभम भेकरेंनी साकारले श्रीरामाचे चित्र

| म्हसळा | वार्ताहर |

तालुक्यातील मौजे जांभुळ गाव या गावातील शुभम भेकरे वय वर्षे 19 असुन त्याने जांभुळ गावात शाळेच्या पटांगणात 512 चौरस फुटात भव्य श्रीरामाचे चित्र काढले आहे. हे चित्र बनविण्यासाठी 540 कोरे पेपर वापरण्यात आले. हे चित्र काढण्यासाठी त्याला सलग 500 तास लागले. कोणतेही आर्थिक सहाय्य नसताना स्वखर्चाने त्याने हे चित्र काढले आहे. हे भव्य चित्र काढून विश्वविक्रम ठरणार असे त्यांनी सांगितले आहे. कारण या अगोदर 509 चौरस फुटात चित्र काढण्यात आले होते. या अगोदर त्याने डाळ, तांदूळ, बिस्किट, वर्तमान पत्र, अशा प्रकारे चित्र काढली आहेत असे त्याच्या घरातील सदस्य यांनी सांगितले. या वेगळ्या विक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा असून हे चित्र पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version