आयसीसी मानांकनात ‘यांचा’ समावेश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय सामन्यातील खेळाडूंची क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. यांचा अपवाद वगळता इतर एकाही खेळाडूचा आघाडीच्या पाचमध्ये समावेश नाही. अष्टपैलू खेळाडूमध्ये तर सर्वोच्च पाचमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आयसीसी एकदिवसीय मानांकनात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सिराज सर्वोच्च 10 गोलंदाजामध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे. सर्वोच्च 5 खेळाडूमध्ये पाकिस्तानच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. शुभमन गिल सर्वोच्च 5 मध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूच्या यादीत आघाडीच्या दहा जणांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. बांग्लादेशचा शाकिब-अल-हसन पहिल्या क्रमांकावर आहे.

जोश हेजलवूड गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद सिराज दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क या यादीत तिसर्‍या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट चौथ्या स्थानावर विराजमान आहे. मॅट हेनरी पाचव्या स्थानावर आहे.

सर्वोच्च पाच फलंदाजामध्ये शुभमन गिल एकमेव भारतीय खेळाडू आहे. गिल चौथ्या क्रमांकावर आहे. फलंदाजामध्ये बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे. फखर जमान दुसर्‍या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वान डेर डूसेन तिसर्‍या स्थानावर आहे. गिल चौथ्या स्थानावर आहे. भारतीय दिग्गज विराट कोहली सातव्या स्थानावर विराजमान आहे तर रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे.

वनडे अष्टपैलूच्या मानांकनामध्ये बांग्लादेशचा शाकिब-अल-हसन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर अफगानिस्तानचा मोहम्मद नबी दुसर्‍या स्थानावर आहे. राशिद खान तिसर्‍या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा चौथ्या स्थानावर आहे. जीशान मकसूद पाचव्या क्रमांकावर आहे. जीशान ओमान देसाचा खेळाडू आहे. हार्दिक पांड्या 13 व्या क्रमांकावर आहे. आघाडीच्या 20 खेळाडूत पांड्या एकमेव आहे.

Exit mobile version