ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात खेळण्याबाबत साशंकता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
विश्वचषक स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, विश्वचषकातील पहिल्या सामन्याअगोदर भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमनच्या अनुपस्थितीत सलामीला कोणाला उतरवाचे असा प्रश्न सध्या टीम इंडियाला भेडसावत आहे. इशान किशन किंवा केएल राहुल यांची नावे सध्या चर्चेत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना रविवारी चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं गुरुवारी चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण, त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली.







