घरोघरी शुभमंगल सावधानचे सूर

भाविकांत उत्साहाचे वातावरण

| म्हसळा | वार्ताहर |

दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाची लगबग सुरू आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून हा विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. यावर्षी बुधवारपासून म्हसळा तालुक्यात अनेक ठिकाणी शुभमंगल सावधानचे असे सूर ऐकू येत आहेत.

पूर्वी घरापुढील अंगणात मोठ्या रांगोळ्या काढल्या जात असत. तुलसी वृंदावनाभोवती दिव्यांची आरासही केली जात असे. दिवा हेच मुळी प्रकाशाचे पहिले पाऊल. दिवा लावणे हा परंपरेने चालत संस्कार आहे. दिव्यांच्या प्रकाशात तुळस उजळून निघत असे. आता अनेक कुटुंबेही हा थाट जपत आहेत. कार्तिक शुल्क एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुल्क नवमी ही तिथी योग्य आहे, असे काही पंडित सांगतात. परंतु काहीजण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशीची पूजा करतात. पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात शुक्रवारी शहरात तुळशीचा विवाह लावण्यात आला. ज्याठिकाणी ब्राम्हण अगर पंडित उपलब्ध झाले त्याठिकाणी त्यांच्या उपस्थितीत तुळशी विवाह करण्यात आला, तर काही ठिकाणी ब्राम्हण उपलब्ध होऊ न शकल्याने पारंपरिक पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला. हा उत्सव मोठी आनंदाची पर्वणी असते, असे भाविकांनी सांगितले.

Exit mobile version