| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे गुरुवारी (दि.29) सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सिकलसेल विशेष अभियान राबविण्यात आले. शासनाच्या वतीने सिकलसेल विशेष अभियान अंतर्गत दि. 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत सर्वच ठिकाणी या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानात तपासणी, निदान व उपचार तसेच समुपदेशन व जनजागृती आदी बाबत प्रबोधन केले जात आहे. श्रमिक विद्यालय चिल्हे येथे राबविण्यात आलेल्या या अभियानप्रसंगी आरोग्य विभागाचे कांचन तेलंगे, प्रतिभा पोटफोडे, आशिष दसरे, तृप्ती महाडिक, सायली मरवडे, भारती वरखले, मुख्याध्यापक दिपक जगताप आदी उपस्थित होते. तर या अभियानात विद्यालयातील सुमारे 250 विद्यार्थी वर्गाची तपासणी करुन समुपदेशन करण्यात आले.







