सिद्धरामय्या यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ

डीकेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

। बंगळुरू । प्रतिनिधी ।

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. याशिवाय, अनेक आमदारांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला देशभरातील राजकीय नेते उपस्थित होते.

हा शपथविधी शनिवारी (दि.20) सोहळा बंगळुरुच्या कांतीराव स्टेडियमवर पार पडला. 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसने 135, भाजपने 66 आणि जेडीएसने 19 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरुन सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील वाद अनेक दिवस सुरुच होता. मात्र, अनेक दिवसांच्या भेटीनंतर आणि हायकमांडनं मन वळवल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले. त्यानंतर आज अखेर शपथविधी सोहळा पार पडला आहे. या शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधकांची एकजूट दिसून आली.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची विशेष उपस्थिती
तर या सोहळ्यात विरोधी पक्षांचे 10 हून अधिक महत्वाचे नेते उपस्थित होते. ज्यात महबूबा मुफ्ती (पीडीपी), नीतीश कुमार (जेडीयू), तेजस्वी यादव (आरेजेडी), डी राजा और सीताराम येचुरी (लेफ्ट), एमके स्टालिन (डीएमके), शरद पवार (एनसीपी), फारुक अब्दुल्ला (नेशनल कांग्रेस), कमल हासन (मक्कल नीधि माईम) यांनी बेंगळुरू येथे नवनिर्वाचित कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वत: उद्ध ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण दिलं होतं. परंतु उद्धव ठाकरे शपथविधीला हजर नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ठाकरे गटाकडून शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची उपस्थिती होती.

Exit mobile version