। रेवदंडा । वार्ताहर ।
अलिबाग ते रेवदंडा मुख्य रस्तालगत चौल भाटगल्ली ते मुखरी गणपती मंदिर मुख्य रस्त्यालगतची साईडपट्टी उनाड झाडेझुडपाने वेढली असल्याने धोकादायक बनून त्यामुळे अपघातास निमत्रंण मिळणार आहे.
अलिबागकडून रेवदंड्याकडे जाताना मुखरी गणपती मंदिर ते चौल भाटगल्ली मुख्य रस्त्यालगत डाव्या बाजूस पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठी गटार लाईन आहे, मात्र या गटार लाईनच्या साईड पट्टीवर उनाड झाडेझुडपी उगवल्याने येथून जा-ये करत असलेल्या वाहनांच्या नजरेत रस्ता येत नाही. अंरूद असलेल्या या रस्त्यात दोन मोठी वाहने परस्पर विरोधी दिशेने पास होत असताना साईडपट्टी न कळल्याने मोठा अपघात घडून येण्याची शक्यता आहे. तरी या साईडपट्टीवर संरक्षक भिंत उभारणे गरजेचे असून पुढील अपघाताचे अनर्थ घडू नये म्हणून संबंधित खात्याने त्वरेने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.