पर्यटनातून होणार बौद्धांच्या स्थळांचे दर्शन

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील भगवान बुद्ध अनुयायींना बौद्धांच्या पवित्र स्थळांची माहिती मिळावी, त्यांचा इतिहास समजावा यासाठी भारतीय बौध्द महासभा (उत्तर) प्रचार व पर्यटन विभागाच्यावतीने धम्म पर्यटनाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही सहल काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सभासद आदींनी मोठ्या संख्येने या सहलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले आहे.

भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दिला. त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा (उत्तर) मार्फत बौद्धांच्या पवित्र स्थळांच्या धम्म पर्यटनाचे नियोजन केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हास्तरावर बैठका घेऊन पर्यटन स्थळी निघणार्‍या पर्यटकांची माहिती तालुका स्तरावर घेण्याची तयारी जोरात सुरु आहे. सारनाथ, बुद्धगया, राजगिरी, नालंदा विश्‍वविद्यापीठ, कुशिनगर, लुंबीनी, कपिलवस्तू, श्रावस्ती, विशाल बुद्ध मूर्ती, सुजाता महल अशा अनेक बौद्धांच्या पर्यटनस्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. 31 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबर या कालावधीत प्रचार व पर्यटन विभागाच्या विद्यमाने ही सहल काढली जाणार आहे. जिल्ह्यातील पर्यटकांनी या सहलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले आहे.

Exit mobile version