खालापूर तहसील कार्यालयात शुभारंभ
| खोपोली | प्रतिनिधी |
जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंघला यांच्या आदेशाने व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्यात तहसील कार्यालयाचे प्रांगणात स्वीप कार्यक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहिमेद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात तहसीलदार खालापूर आयुब तांबोळी व पोलीस उपविभागीय अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या हस्ते फीत कापून (दि.17) एप्रिल रोजी करण्यात आली.
यावेळी अपर तहसीलदार पूनम कदम, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, महसूल नायब तहसीलदार विकास पवार, निवडणूक नायब तहसीलदार दशरथ भोईर, मंडळ अधिकारी संदेश पानसरे आदी प्रमुखांसह तहसील कार्यालयातील कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. याप्रसंगी सदर स्वाक्षरी मोहिमेतून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच खालापूर मंडळातील खालापूर येथील मोरेवाडी येथे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली असून, यावेळी मंडळ अधिकारी संदेश पानसरे, तलाठी प्रतिक बापर्डेकर, तलाठी किरण लोखंडे, कोतवाल आरती निधी उपस्थित होते.