। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत रेल्वे स्थानकात डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविणात यावेत यासाठी रेल्वे प्रशासनाशी गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यात आले आहेत. कर्जत स्थानकात आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी येणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. कधी आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात गाडी चुकायची तर कधी समान फलाटवरच रहायचे तर काही वेळा डब्बा पकडण्याच्या नादात अपघातही झाले आहेत. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस गाड्याच्या बाबतीत डब्यांची स्थिती दर्शविणारे छोटे डिजिटल इंडिकेटर्स बसविण्यात यावेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल गेल्या दोन वर्षा पासून रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते.







