सुंदरराव मोरे महाविद्यालयाचा रौप्य महोत्सव

| पोलादपूर | वार्ताहर |

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी दिली आहे.

रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उदघाटन विधानपरिषद सदस्य आ.प्रवीण दरेकर यांच्याहस्ते होणार असून खा. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमाला महाड विधानसभा मतदार संघाचे आ. भरत गोगावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रौप्य महोत्सवी वर्षातच महाविद्यालयाने प्रथमच ऑॅनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करून विविध क्षेत्रातील गुणवत्तेच्या आधारावर मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय हा पुरस्कार देखील प्राप्त केला आहे. नॅक संस्थेच्या तृतीय अधिस्वीकृतीसह आयएसओ मानांकन प्राप्त करणार्‍या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभा समवेत शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

शिवाई शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त अमित मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार्‍या या कार्यक्रमासाठी परिसरातील पालक वर्ग आणि नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर व उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी केले आहे.

Exit mobile version