‘शिवधन’चा रौप्यमहोत्सव

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील शिवधन पतसंस्था आज स्वमालकीच्या वास्तुत उभी आहे. शनिवारी या पतसंस्थेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  

धाकटेभोम गावातील डीएड ची पदवी संपादन करणारे गणेश म्हात्रे यांनी शिक्षकी पेशाकडे न जाता येथील नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन आपल्या विश्‍वासातील चार-पाच सहकार्‍यांना हाताशी धरुन त्यांनी 1998 साली शिवधन पतसंस्थेची निर्मिती केली. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असावा यासाठी गणेश म्हात्रे धडपडत आहेत. त्यामुळे गणेश म्हात्रे यांची या शिवधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी सहाव्यांदा, तर व्हॉइस चेअरमनपदी गजानन वशेणीकर यांचीही तिसर्‍यांदा निवड करण्यात आली.

आज 2022-23 या आर्थिक वर्षात पतसंस्थेचे खेळते भांडवल 21. 08 इतके आहे. एकूण ठेवी 16.82 कोटी यातून कर्ज वाटप 12.31 कोटी, गुंतवणूक 07.32  कोटी,स्वनिधी 02.98 कोटी. एकत्रित व्यवसाय 29.13 कोटी, सी.डी. रेशिओ 67.34 टक्के, नफा 47.19 लाख आहे, अशी माहिती चेअरमन गणेश म्हात्रे व्हाईस चेअरमन गजानन वशेणीकर यांनी दिली. ठेवीदार, भागधारकांचा प्रचंड विश्‍वास संपादन करण्यात शिवधन पतसंस्था यशस्वी झाली आहे. आज शेकडो कर्मचारी, तितकेच पिग्मी एजंट आणि त्यांचे संसार शिवधन पतसंस्थेमुळे सुरळीत मार्गी लागले आहेत. याचे श्रेय शिवधन पतसंस्थेला पर्यायाने चेअरमन गणेश म्हात्रे यांना जाते.

Exit mobile version