सहयोग पतसंस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबाग येथील सहयोग पतसंस्थेनी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमीत्ताने वर्षभर संस्थेमार्फत विवीध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश मगर यांनी दिली.

पतसंस्थेकडील ठेवी 35 कोटीवर पोहोचल्या आहेत. संस्थेनी गेल्या वर्षभरात 55 कोटींचा व्यवसाय केला आहे. संस्थेचे सात हजार ठेवीदार असून, 2 हजार 400 सभासद आहेत. गेली काही वर्ष संस्थेला सातत्याने ऑडीट मध्ये अ वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेचा प्रतिकर्मचारी व्यवसाय हा 10 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे संस्थेची वाटचाल भक्कम रितेने सुरू असल्याचे मगर यांनी यावेळी सांगितले.

रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेमार्फत विवीध सामाजिक, आर्थिक आणि सहकाराशी निगडीत उपक्रम राबविले जाणार आहेत. यात अर्थसाक्षरतेसाठी व्याख्याने आयोजित करणे, सहकार मेळाव्यांचे आयोजन करणे, संस्थेसाठी स्वमालकीची जागा खरेदी करणे, ठेवीदारांसाठी आकर्षक ठेव योजना, सुवर्ण सुलभ खरेदी योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संस्थेचे संचालक, व्यवस्थापक तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version