| खरोशी | प्रतिनिधी |
झारखंड येथे 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उरणच्या मैत्रेय मोकल याने 93 किलो वजनी गटामध्ये राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले होते. त्या कामगिरीच्या जोरावर त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने एकूण 658 किलो वजन उचलून ही कामगिरी साध्य केली आहे. या यशामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच मैत्रेयला हे यश संपादन करता आले. या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच, या रौप्यपदकाच्या जोरावर त्याची निवड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली असून ती नोव्हेंबरमध्ये भूतान येथे होणार आहे. त्याच्या या चमकदार कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
उरणच्या मैत्रेय मोकलचे ‘रौप्य’ यश
