राज्यपालांच्या पदमुक्ततेवरुन वावड्या

राजभवनातून मात्र इन्कार
। मुंबई । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन चोहोबाजू कडून टीका होऊ लागल्याने राज्यपालपदावरुन मुक्त करा,अशी मागणी भगतसिंग कोश्यारी यानी केंद्राकडे केली असल्याचे वृत्त समाजमाध्यमांमधून व्हायरल झाले .राजभवनने मात्र याचा इन्कार केला आहे.

राज्यपालपद स्वीकारल्यापासून कोश्यारी हे विविध कारणांमुळे वादग्रस्तच बनलेले आहेत.विशेष करुन छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली.

आतापर्यत कोश्यारी यांच्यावर शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. काही दिवसांपासून राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे त्यांना तातडीनं महाराष्ट्रातून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वत राज्यपाल यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांनी आपल्याला आता आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोश्यारी यांच्यावर समाजमाध्यमांमधूनही नेटकर्‍यांनी तोफ डागली आहे.

कोश्यारी यांची प्रतिक्रिया व्हायरल होताच त्यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली आहे. अनेकांनी यावेळी सुचक वक्तव्यंही केली आहेत. जसं की, राज्यपाल यांना जायला सांगितले की त्यांना खरचं जायची इच्छा आहे. त्यांना केंद्रातून आदेश आला की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनी आता नेटकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजभवनाचा इन्कार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे. कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यपालांच्या विरोधात आक्रोश मेळावा
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले येत्या 3 डिसेंबरला जनआक्रोश मेळावा घेणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाकडून अवमानाची दखल घेतली जात नसेल तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. यासंदर्भात देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना 3 डिसेंबर नंतर भेटून याबाबत गार्‍हाणे मांडणार असल्याचे उदयनराजे यांनी जाहीर केले. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनाची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत

Exit mobile version