दोन वर्षांनंतर मिळू शकेल पहिले अजिंक्यपद
| क्वालालंपूर | वृत्तसंस्था |
ऑलिंपिक तोंडावर आलेली असताना फॉर्म मिळालेल्या पी.व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. विजेतपदासाठी आता केवळ एक विजय दूर असलेल्या सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतर थायलंडच्या बुसमन हिचा पराभव केला. काही महिन्यानंतर खेळत असलेल्या सिंधूने एकेक पाऊल ठोसपणे टाकत ही प्रगती केली आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत तिला तीन गेमपर्यंत लढावे लागले. आजचा उपांत्य सामनाही अपवाद नव्हता; परंतु आज तिला तब्बल 88 मिनिटे प्रतिकार करावा लागला. अखेर 13-21, 21-16, 21-12 आशा विजयाने अंतिम फेरीचा मार्ग सापडला.
सिंधूने 2022 मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होत. तर, गतवर्षी माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बुसमनवर हा तिचा 18वा विजय आहे. तिच्याविरुद्ध केळव एकच सामना आणि तोही 2019 मध्ये हाँगकाँग ओपनमध्ये गमावला होता. जागतिक क्रमवारीत सध्या 15व्या स्थानावर असलेल्या सिंधूचा विजेतेपदासाठी चीनच्या वेंग झाई यी हिच्याविरुद्ध होणार आहे. वेंग या स्पर्धेत दुसरे मानांकित आहे. तर, ती जागतिक क्रमवारीत तिचे सातवे स्थान आहे. गतवर्षी आर्स्टिक ओपन स्पर्धेत सिंधू वेंगकडून पराभूत झाली होती; परंतु, तिच्याविरुद्ध एकूण तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत सिंधू सरस ठरलेली आहे.
ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि एक ब्राँझपदक जिंकणाऱ्या सिंधूला आपला लय सापडल्याचे दिसून येत आहे. मुळात गुडघा दुखापतीनंतर ती परतली आहे. पुनरागमनात तिचा आक्रमक खेळ कायम राहिला आहे, हे विशेष. या मलेशिया मास्टर्स स्पर्धेतील कामगिरीमुळे सिंधूकडून पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतही अशीच भरीव कामगिरी करण्याच्या आशा उंचावल्या असल्या तरी गेल्या अनेक सामन्यात तिला कॅरोलिना मरिन, ताय झु यिंग, चेन यू फेई आणि अकाने यामागुची यांचा गड भेदता आलेला नाही. या दिग्गज खेळाडूंचा सामना सिंधूला ऑलिंपिकमध्ये करावा लागणार आहे.