सिंधुदुर्गची रिक्त पदे भरणार; कामगार आयुक्तांची ग्वाही

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी पदे रिक्त आहेत ती लवकरात लवकर भरू, अशी ग्वाही राज्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी स्वयंप्रेरीत इमारत व इतर बांधकाम मजूर संस्था, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाला दिली. ऑनलाईन कंपनीचा सॉफ्टवेअर योग्यरितीने काम करत नसल्याबाबतही लक्ष वेधण्यात आले.
लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत व कामगार आयुक्त जाधव व त्यांचे सचिव श्रीरंगम यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्‍नांसाठी महत्त्वाची बैठक कामगार आयुक्त मुंबई यांच्या दालनात झाली.
या चर्चेमध्ये कामगारांच्या विविध योजनेविषयी चर्चा करण्यात आली. ज्या कामगारांचे 2018 मध्ये कामगार प्रशिक्षण झालेले आहे व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, अशा कामगारांनी आपले डॉक्युमेंट परत द्यावयाचे आहेत. प्रशिक्षण सर्टिफिकेट झेरॉक्स, कामगारांचे आधारकार्ड, बँक पासबुकची 2018 पासून ते आतापर्यंतची नोंद, पुस्तक क्रमांक 3, 7 ही कागदपत्रे ऑफिसमध्ये जमा करावयाची आहेत तसेच सध्या कार्यालयामधील सबइन्स्पेकटरची तीन पदे रिक्त आहेत. त्याबाबत चर्चा करण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले.
सुजित जाधव हे वारंवार बांधकाम कामगारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मदत करत असतात, असे स्वयंप्रेरीत इमारत व इतर बांधकाम मजूर संस्था-सिंधुदुर्गचे सचिव अशोक बावलेकर यांनी सांगितले. बैठकीला श्रीमती लोखंडे तसेच स्वयंप्रेरीत इमारत व इतर बांधकाम मजुर संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष संतोष झारापकर, सचिव अशोक बावलेकर, उपाध्यक्ष काशिराम वाईरकर व सल्लागार प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

Exit mobile version