रायगड जिल्ह्यातील गायक, गीतकार, संगीतकार विशाल अभंगे यांचे हृदविकाराच्या धक्क्याने निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील गायक, गीतकार, संगीतकार वादक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले विशाल अभंगे यांचे हृदविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रायगड भूषण संगीतकार गायक अशोक हिरामण अभंगे यांचे ते सुपुत्र होत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यु पनवेल येथे करंजाडे या ठिकाणी झाला.
त्यांच्या अंटीयात्रेवेळी नातेवाईक, मित्र परिवार तसेच गायक योगेश आग्रावकर, महेंद्र पाटील, नवीन मोरे, विनय पाटील, वृषल लाडगे,संतोष पाटील, अभिनेते योगेश पवार, सचिन शिंदे, असे अनेक अलिबाग, पेण, पनवेल, मुंबई मधले गायक, कवी, वादक उपस्थित होते. विशाल अभंगेग यांनी अनेक सुप्रसिद्ध गाण्यांना चाल दिले, आवाज दिलाय, अनेक मोठ मोठ्या कलाकारांसोबत ऑर्केस्ट्रा, भजन, कव्वाली, yoytube गाणी गायली आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी, बहिणी, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबात गायनाची परंपरा आहे. वडील, भाऊ, बहिण सगळे गायक आहेत.
वडील अशोक अभंगे यांचे सुद्धा संगीत क्षेत्रात खुप नाव आहे आणि अनेक गायक, संगीतकार त्यांच्या हाताखाली घडले आहेत. विशाल आभांगे यांच्या निधनाबद्दल अनेक गायक, वादक, भजनी, कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे

Exit mobile version