बहीण, भाऊ व आत्याची सख्या भावाकडून फसवणूक

Yellow crime scene do not cross barrier tape in front of defocused background. Horizontal composition with selective focus and copy space.

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
जमिनीच्या मिळालेला मोबदला विश्‍वैृ साने वाटप करण्याकरता अधिकार दिलेले असताना हसूराम मोरेश्‍वर पाटील यांनी बँकेत असलेल्या रकमेचा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता अपहार करून बहीण, भाऊ व आत्या यांची 1 कोटी 93 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरण पोलीस ठाणे येथे हसूराम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोकडविरा येथील जमीन महाराष्ट्र शासनाने न्यू बॉम्बे प्रोजेक्ट करता संपादित केलेली आहे. मंगला म्हात्रे व वारसांनी जमिनीची वाढीव रक्कम मिळण्याकरता अर्ज केला. त्यानुसार 3 कोटी 1 लाख 38 हजार 449 रुपये नुकसानभरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली. नुकसान भरपाईपोटी मिळालेल्या रकमेबाबत हसुराम पाटील यांच्याकडे विचारणा केली असता तो वेळोवेळी कारणे सांगून टाळाटाळ करत होता. हसूराम पाटील यांनी मंगला यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली. मंगला म्हात्रे यांच्या हिष्यपोटी मिळणार्‍या एकूण 75 लाख रुपयांपैकी केवळ पाच लाख रुपये एवढी रक्कम देऊन त्यांची 70 लाख रुपयांची फसवणूक केली. व भाऊ राम मोरेश्‍वर पाटील व आत्या मथूरा पाटील अशा तिघांची मिळून एकूण एक कोटी 93 लाखांची फसवणूक केली.

Exit mobile version