वडिलोपार्जित मालमत्तेसाठी बहिणीला पेटविले

। पुणे । वृत्तसंस्था ।
वडिलोपार्जित मालमत्तेसाठी मोठ्या बहिणीला पेटविण्याची औधमधील घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भावाला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाम मनोहर पतंगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्या 45 वर्षाच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने सख्ये भाऊ बहिण आहेत. वडिलांच्या संपत्तीवरुन दोघांमध्ये वाद आहेत. फिर्यादी या औंधमधील घरी असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाम पतंगे त्यांच्या घरी दारु पिऊन आला. त्यांच्याशी वाद घातला. फिर्यादी या स्वयंपाक घरामध्ये खुर्चीवर बसून आराम करीत असताना शाम याने त्याच्याकडील माचिसच्या काडीने फिर्यादी यांना आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी यांची हनुवटी, दोन्ही गाल तसेच मानेपासून खाली पायापर्यंतचा सर्व भाग भाजले

Exit mobile version