सुपारी संघात सहा उमेदवार बिनविरोध

5 जानेवारी रोजी मतदान होणार
| आगरदांडा | प्रतिनिधी |
तीन कोटीची वार्षिक उलाढाल असणारा मुरुड तालुक्यातील नामंकित मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाची निवडणूक काही दिवसापूर्वी लांबणीवर गेली होती. परंतु आता 20 डिसेंबरनंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तद्नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नांदगाव विभागातून तीन उमेदवार निवडून येत असतात; परंतु येथे विरुद्ध गटाच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नांदगाव विभागातून मोअज्जम हसवारे, नरेश नारायण पाटील, राजेंद्र गुरव हे बिनविरोध निवडून आल्याचे सहकारी संस्थांचे ए.आर. प्रशांत पाटील यांनी जाहीर केले आहे. तसेच भोईघर, बेलवाडी व म्हाळुंगे येथून एक उमेदवार निवडून येतो येथे एकच अर्ज प्राप्त झाल्याने येथील उमेदवार रामजी वणे यांनासुद्धा बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महिला प्रतिनिधीमधून दोन उमेदवार निवडून येत असतात. या प्रभागातूनसुद्धा विरोधी गटातील सदस्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे येथून बेलोसे भाग्यश्री भरत व असिया रमीज घलटे यासुद्धा बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आता उर्वरित जागांसाठी 5 जानेवारी रोजी मतदान सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. या सुपारी संघावर बिनविरोध निवडून आलेले संचालक व नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोअज्जम हसवारे यांनी सांगितले की, यांनी सांगितले सुपारी संघाच्या भरभराटीसाठी प्रयत्नशील राहणार असून, सभासदांना सर्वोत्तम भाव मिळवून देणार असल्याचे यावेळी सांगितले. मुरुड शहरातून सात उमेदवार निवडून जातात. या सात उमेदवारांसाठी 14 अर्ज दाखल झाले आहेत.म्हणजे येथे दुरंगी लढती होणार आहेत.भटक्या विमुक्त जाती जमाती मधून एक उमेदवार निवडून द्यव्याचा आहे येथे दोन अर्ज आल्याने येथे सुद्धा निवडणूक होणार आहे. तसेच इतर मागासवर्गीय मधून एक उमेदवार निवडून देणे आहे येथेसुद्धा दोन अर्ज प्राप्त झाल्याने याठिकाणी निवडणूक होणार आहे.

संपन्न होणार्‍या या निवडणुकीत सुपारी खरेदी विक्री संघाचे 1306 सभासद असून, ते आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार होते. सहकारी तत्वावर स्थापन झालेला हा सुपारी संघामुळे स्थानिक लोकांनासुद्धा मोठा रोजगार प्राप्त झाला आहे. मुरुड तालुक्यातील सुपारीचे पीक घेणार्‍या बागायतदारांना चांगला भाव मिळवून देण्याचे काम सुपारी संघातर्फे होत असते.दर पाच वर्षांनी या संघाची सार्वत्रिक निवडणूक होत असते. 17 संचालक विविध भागातून निवडून दिले जात असतात. निवडून आलेल्यामधून चेरमनपदाची निवड होत असते. 17 पैकी 6 जागा बिनविरोध आल्या आहेत आता उर्वरित 11 जागांसाठी निवडणूक 5 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

या निवडणुकीत उत्सुक उमेदवार आपापले स्वतंत्र पॅनल काढून हि निवडणूक लढवत असतात.या निवडणुकीत ज्यांची बागायत जमीन आहे त्यांनाच मतदानाचा हक्क असतो. दोन्ही पॅनलकडून अर्ज दाखल करण्यात आले असून, सर्वानी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

Exit mobile version