शिक्षकाला सहा दिवसांची कोठडी

| मुंबई | वृत्तसंस्था |

देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचं लातूर कनेक्शन आता थेट सोलापूर जिल्ह्यातील माढ्यापर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी दोन शिक्षकांना दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयात हजर केले असता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला सहा दिवसांसाठी पोलिसांच्या कोठडीत पाठवले आहे. आरोपी संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचं काम करत होता. जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या उपशिक्षकाचं नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्यानं माढा तालुक्याच्याच नव्हे तर सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागातही खळबळ माजली आहे.

Exit mobile version