। नागपूर । प्रतिनिधी ।
मलकापूर येथील आठवडी बाजारात रविवारी (दि. 13) मध्यरात्री भीषण आग लागली. यात सहा दुकाने व त्यातील माल जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्यासह पोलीस पथक आठवडी बाजार परिसरात दाखल झाले. मलकापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलानेही घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यास सुरुवात केली. या आगीत 5 ते 6 दुकाने जळून खाक झाली. तसेच, तर इतर दुकानांसह नजिकच्या गोदामांना आगीची झळ पोहोचली. या घटनेत व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने संभाव्य अनर्थ टळला.
आगीत सहा दुकाने जळून खाक

fire isolated over black background