। रसायनी । वार्ताहर ।
विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे इंडिया तायक्वांदो आयोजित चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अंतिम फेरी तसेच कॅडेट जागतिक तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा तसेच कॅडेट व जुनियर आशियाई तायक्वांदो स्पर्धा 2023 निवड चाचणी करीता अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अटॅकर्स, गुरुकुल व वीर तायक्वांदो अकॅडमी मधील एकूण 22 खेळाडू पात्र झाले होते. सदर निवड चाचणीमधील विजेते खेळाडूंची भारतीय तायक्वांदो संघासाठी पात्र झाले आहेत.
यामध्ये गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीतील राज जाधव, ध्रुव शेट्टी व साई जाधव यांची कॅडेट सांघिक मुले तर किरण कदम, निशीता पाडेकर व संस्कृती पाटील यांची जुनियर सांघिक मुली या गटांत प्रथम क्रमांक पटकावून दि. 2 ते 9 सप्टेंबर 2023 दरम्यान लेबनॉन येथे होणार्या आशियाई तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून रायगडचे नाव लौकिक केले. ह्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक तुषार सिनलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
सदर स्पर्धेत सब-जुनियर गटात स्वयम नाईक याने 23 किलोखालील गटात सुवर्णपदक पटकावले तर श्रवण भोसले व श्लोक माळी यांनी अनुक्रमे 27 व 29 किलोखालील गटात कांस्यपदक मिळविले. याशिवाय जुनियर गटात प्रीति पाटणे व निहाल भोईर यांनी अनुक्रमे 55 किलोखालील व 78 किलोखालील गटात कांस्यपदक मिळविले. जुनियर जोडी प्रकारात प्रणित टाचतोडे व समृद्धी कापसे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर ओमकार भोसले, राज जाधव, साई जाधव, साईराज पाटील, खंतेश वास्कर, प्रेम पाटणे यांनी सहभाग नोंदविला.
सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्षा प्रज्ञा भगत मॅडम, उपाध्यक्ष संजय भोईर, सचिव सचिन माळी सर व खजिनदार रोहित सिनलकर यांनी तसेच इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, राज्य संघटनेचे अध्यक्ष आबा झोडगे सर, महासचिव संदीप ओंबासे सर , सी ई ओ गफार सर यांनीही अभिनंदन केले व आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय तायक्वांदो संघात पात्र झालेल्या खेळाडूंना शुभेछा दिल्या. खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.