सिक्सर किंग पुन्हा उतरणार मैदानात

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग यानं एक आश्‍चर्यकारक निर्णय घेतला आहे. आपण पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याची घोषणा त्यानं इन्स्टाग्रामवरील पोस्टद्वारे केली. देवचं तुमचं नशिब ठरवतो, असं म्हणत त्यांनं एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. आपण पुन्हा कधी मैदानात दिसू हेदेखील त्यानं यातून सांगितलं आहे. युवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर तो जगभरातील फ्रान्चायझी क्रेकिटमध्ये खेळला. त्यानं टी20 लीगमध्ये टोरंटो नॅशनल्सचं प्रतिनिधीत्व केलं, तसंच तो अबुधाबीमध्ये झालेल्या टी10 स्पर्धेत अरेबियाकडूनही खेळला. मार्च 2021 मध्ये तो रोड सेफ्टी मालिकदरम्यान शेवटचा मैदानात दिसला होता.

Exit mobile version