रायगडातील सोळा जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मान्यवरांच्या हस्ते वितरण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून 16 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवारी (दि.5) शिवतीर्थावरील नाना पाटील सभागृहात केले जाणार आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये अलिबागमधील रविंद्र गोविंद थळे, पेण जयश्री जगदीश म्हात्रे, पनवेल विद्या संजय पाटील, कर्जत दिलिप सोपान घुले, खालापूर महेश नामदेव म्हात्रे, उरण संजय जयराम होळकर, सुधागड सतीश किसन खानेकर, रोहा विलास रामचंद्र सुटे, महाड अंजली अरुण चांदोरकर, श्रीवर्धन क्रांती लालासाहेब भोसले, म्हसळा किशोर दादाराम मोहिते, पोलादपूर सचिन परशुराम दरेकर, माणगाव सुनिल धर्मा गोरेगावकर, तळा प्रतिभा राजेंद्र पाटील, मुरुड राजेंद्र चाया साळावकर व विशेष शिक्षक पुरस्कार (दिव्यांग) रोहा दिपक घनश्याम पाबेरकर यांना देण्यात येणार आहे.

Exit mobile version