वीर वाजेकर महाविद्यालयात कौशल विकास मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

| उरण | विठ्ठल ममताबादे |

रयत शिक्षण संस्थेच्या, वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे कौशल विकास मार्गदर्शन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व 18 ते 30 वयोगटातील सर्व तरुणांना नोकरीसाठी आवश्यक ते विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे, याबद्दल माहिती करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सिनियर प्रोग्राम असोसियट नितीन अंब्रूले यांनी त्यांच्या मार्फत घेतले जाणाऱ्या कोर्सबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच हे सर्व कोर्स मोफत कॉलेज मध्येच सुरु करण्याबद्दल ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जयवंती गोंधळी यांनी नर्सिंग कोर्स व हॉस्पिटॅलिटी कोर्सबद्दलची पूर्ण माहिती तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर जॉब मिळण्याचे आश्वासन दिले. पुष्पा गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मल्टी फ्ंकशनल ऑफिस अटेंडट कोर्समध्ये कॉम्प्युटर, संभाषण, रेकॉर्ड, खरेदी इत्यादी सर्व बाबतीचे दिले जाणारे प्रशिक्षण याबद्दलची माहिती दिली. या प्रसंगी 150 विद्यार्थी, माजी विद्यार्थी व गरजू युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. झेलम झेंडे यांनी केले. सूत्र संचालन प्रा. प्रांजल भोईर यांनी व आभार प्रा. भूषण ठाकूर यांनी केले.

Exit mobile version