किहीम आदिवासी वाडीत कौशल्य विकास माहिती शिबीर उत्साहात

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे शुक्रवारी (दि.6) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा खारघर यांचे कौशल्य विकास माहिती शिबीर पार पडले. यावेळी आदिवासी मुलांनी संस्कृती सांगणारे नृत्य सादर केले. जातीचे दाखले व मतदान कार्डाचेही वाटप केले. यावेळी तसेच या कार्यक्रमात मान्यवर व प्रमुख पाहुण्यांनी बालविवाह विषयक कायदे, विविध सुविधा, योजना अशा अनेक गोष्टींची अतिशय उत्तम माहिती दिली.

यावेळी अलिबाग तहसिलदार मिनल दळवी, प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग पंचायत समिती विस्तार अधिकारी मंगेश पाटील, अलिबाग-रायगड सांखिकी एकात्मिक बालविकास प्रकल्प विस्तार अधिकारी अल्पना शिंदे, करल अ‍ॅण्ड यंग फाउंडेशन पेण समाजसेवक संचालक सुशिल सायकर, अलिबाग-रायगड जिल्हा सत्र न्यायालय वकिल पल्लवी तुळपुळे, वात्सल्य ट्रस्ट संचालिका सुचिता पटवर्धन, किहीम ग्रा.पं.सरपंच सिमा थळे, अ‍ॅड. कांचन नार्वेकर, सर्वादय सामाजिक सेस्थेचे अध्यक्ष प्रशांत नार्वेकर, किहीम पोलिस पाटील संध्या काठे, तलाठी विनोद शिंगाडे, धोकवडे बीट सुपरवायझर कल्पिता साळावकर, मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रकार्य मार्गदर्शक सचिन कदम, समाजकार्य विभाग प्रमुख समाजकार्य टिळक महाराष्ट्र विद्यापीठ विभागप्रमुख डॉ.प्रकाश यादव, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समन्वय खारघर शाखा स्मिता वारघडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ समन्वय खारघर शाखा कोमल देवकाते, तसेच संयोजक रेश्मा म्हात्रे, जना जाधव, वृषाली कोकाटे, रिया पाटील, रोहिणी हांडे, राजश्री नाईक, धनश्री गुंड, योगेश साखरे हे विद्यार्थी उपस्थित होते.

या शिबीरात गेली पंधरा ते वीस दिवस टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा खारघरचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी किहीम आदिवासी वाडीचा अभ्यास केला. तसेच तेथील लोकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून अनेक वस्तू बनवायला शिकवल्या. त्यानंतर जातीचे दाखले, मतदान कार्ड इत्यादी गोष्टी त्यांना मिळवून दिल्या. लहान मुलामुलींना शिकवले.

Exit mobile version