महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण

। अलिबाग । वार्ताहर ।
कोरोनाजन्य परिस्तिथीचे सर्व नियम पाळून व कौशल्य विकास उपक्रम आदिंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जन सामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना व कायदेविषयक जनजागृती माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत रोठ बुद्रुक रोहा येथे सी.एस.आर. एक्सेल इंडस्ट्रीज, स्वामी विवेकानंद रिसर्च ट्रेनिंग सेंटर, जे. एस. एस. रायगड व ग्रामपंचायत रोठ बुद्रुक रोहा यांच्या माध्यमातून महिलांना कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये संस्था विविध उपक्रम राबबित असते. याच उपक्रमाचा भाग म्हणून सदर कार्यक्रमा प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, नितिन वारंगे सरपंच, वेदिका डाके उपसरपंच, अलका बामुगडे ग्रामसेविका, वैभवी भगत, अमित घाग सदस्य, राजेश भगत ग्रामस्थ, सुप्रिया वारंगे, सायली सुभाने जिल्हा कौशल्य विकास प्रतिनिधी व जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी सुकन्या नांदगावकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्रशिक्षिका सारिका पाशिलकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.

Exit mobile version