कौशल्य प्रशिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली : डॉ. सोमैय्या

। अलिबाग । वार्ताहर ।
कौशल्य प्रशिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन जेएसएस रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा सोमैय्या यांनी केले. ‘कौशल्य प्रशिक्षण ही काळाची गरज’ व ‘सार्वजनिक स्वच्छता’ या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम 29 जुलै रोजी श्रीवर्धन येथील रानवली ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास संचालक विजय कोकणे हेसुद्धा उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी रानवाली श्रीवर्धन येथील महिला भगिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे व सर्व उपस्थितांना विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करून स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. महिला ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला लाभधारकांना कौशल्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच सेजल गजमल, उपसरपंच वृत्तीका हावरे, ग्रामसेवक अभिजीत माने, ग्रामपंचायतचे सदस्य संस्कृती काप, शैलेंद्र गजमल, प्रमोद पवार, रोहिणी सापटे, रजनी सापटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुकन्या नांदगावकर, भाविका जोशी, विप्राली पुसाळकर, अफसरी अराई, कर्मचारी हिमांशू भालकर, सुरेंद्र तांबडे, दत्तात्रेय बोले आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version