नव्या नियमावलीबाबत क्रीडाक्षेत्रातून संतापाची लाट
| पुणे | वार्ताहर |
क्रीडा नैपुण्याने महाराष्ट्राच्या नावलौकिकात भर घालणार्या खेळाडूंना देण्यात येणार्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली असून, यातून आतापर्यंत समाविष्ट असलेल्या सहा क्रीडाप्रकारांना वगळण्यात आले आहे. यात कॅरम, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव(बॉडीबिल्डिंग), बिलियर्ड्स-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ आणि यॉटिंग या क्रीडाप्रकारांचा समावेश आहे. राज्य क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाबाबत क्रीडाक्षेत्रातून संतापाची लाट उसळली आहे.
शासनाने नव्याने जाहीर केलेल्या पुरस्कार नियमावलीनुसार, वगळण्यात आलेल्या खेळासंदर्भात ऑलिम्पिक प्रकार नसल्याचा किंवा राज्यात त्या खेळाचा प्रसार नसल्याची कारणे देण्यात आली आहेत. त्याच बरोबर वगळण्यात आलेल्या खेळांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) मान्यता नसल्याचेही समोर आले आहे. शासनाने दिलेली कारणे हा पूर्णपणे लालफितीचा कारभार असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत या प्रत्येक खेळातील खेळाडूला शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात येत होते.
पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कॅरम, बिलियर्ड्स-स्नूकर या चार खेळांचा ऑलिम्पिक किंवा अन्य कुठल्याही मोठय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत समावेश नसल्याचे कारण देण्यात आले आहे. या खेळांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचीही मान्यता नसल्याचे राज्य क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
आटयपाटयसाठी पारंपरिक खेळाची सबब आटयपाटय खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धाची माहिती गेली अनेक वर्षे समोर येत नसतानाही या खेळाला पुरस्कारांना सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी पुरस्कार मिळाला आहे.आटयपाटय खेळाच्या मान्यतेचा प्रश्न ऐरणीवर असूनही केवळ पारंपरिक क्रीडा प्रकार म्हणून या खेळाला सामावून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात राष्ट्रीय स्पर्धा व्हायलाच हव्यात अशी अट नाही. राष्ट्रीय स्तरावरीलही स्पर्धाचे गुण ग्राह्य धरले जातील असा बचाव करण्यात आला आहे. शासकीय माहितीनुसार, आटयपाटय संघटनेची राज्य संघटना अस्तित्वात असून 26 संलग्न जिल्हा संघटना असल्याचे समजते.







