ना आमदार, ना खासदार, संतोषभाई दमदार

खालापूरमध्ये शेकापला मोठ्या विजयाची आशा
। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या दिवशी शेकापने रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या रॅलीत खालापुरमधील मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ना आमदार ना खासदार संतोषभाई दमदार अशा गगनभेदी घोषणांनी खालापूर शहर दणाणून निघाले होते. या रॅलीत स्थानिकांचा मोठा सहभाग असल्याने शेकापक्षाचा मोठ्या फरकाने विजय निश्‍चित मनाला जातोय.

खालापूर नगर पंचायतीच्या 16 जागांसाठी मंगळवारी 21 डिसेंबर मतदान होणार आहे. सत्ताधारी शेकापक्षाच्या विरोधात शिवसेनेने मोठी ताकद लावली आहे. मात्र विकास कामांच्या जोरावर शेकापक्ष या निवडणुकीत पुन्हा बाजी मारेल असे चित्र आहे. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यावेळी शेकापक्षाने मोठी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

किती पण डोळे वटारा, निवडून येणार खटारा. ना आमदार ना खासदार संतोषभाई दमदार अशा घोषणांनी खालापूरचा परिसर दणाणून गेला होता. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. खालापूर बाजारपेठेत फिरल्यानंतर संतोष जंगम यांच्या निवासस्थानी रॅलीची सांगता झाली. विशेष म्हणजे प्रचारात आणि रॅलीत फक्त स्थानिक कार्यकर्तेच दिसत होते. शिवसेनेने मोठी ताकद लावली असताना शेकापक्षाचे स्थानिक कार्यकर्ते संतोष जंगम आणि शिवानी जंगम यांच्या सोबत ठाम असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version