| उरण | वार्ताहर |
शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण जेएनपीए (टाऊनशिप) येथील मल्टीप्लेक्स हॉलमध्ये शुक्रवारी (दि. 14) रोजी सकाळी 10-30 वा. सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यामध्ये आजही शेकापक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी तसेच शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक होणार आहे. या सभेसाठी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, पनवेल मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उरण तालुका शेकापकडून करण्यात येत आहे.