शे.का.पक्षाच्या कार्यकर्त्या प्रेमलता दीनानाथ पाटील यांचे निधन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी|

सौ. प्रेमलता दीनानाथ पाटील यांचे गुरूवारी (दि.16) 83 व्या वर्षी अल्पशा आजाराने बहिरीचा पाडा या गावी निधन झाले. त्या शेकापच्या मानकुळे विभागाच्या कार्यकर्त्या तसेच मानकुळे ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच होत्या. 1998 मध्ये ग्राम पंचायत मानकुळे येथे सदस्य म्हणून बिन विरोध निवडून आल्या होत्या. ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, लोकसभा, विधान सभा या प्रत्येक निवडणुकीत पायात चप्पल न घालता मतदारांच्या सातत्याने भेटी घेऊन शेकापला मतदान करण्यासाठी काम करत असत.

सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्राची आवड भरपूर होती. दानशूर वृतीच्या होत्या. स्वभाव मनमिळाऊ, प्रेमळ होता. यांचे घरात मुलगा डॉक्टर असून तोही सरपंच होता. मोठी सूनही सरपंच होती. घरात राजकीय शेकापचा चार पिढ्यांचे नेतृत्व आहे. निष्ठावंत घराण्याचा आजही वारसा सांभाळला जातोय. यांचे पती श्री. दीनानाथ मसनाजी पाटील हे प्रा. शाळेत मुख्याध्यापक होते. ते सेवानिवृत्त आहेत. ते ही सामाजिक, राजकीय शेत्रात कार्यरत आहेत. शेकापचे माजी अध्यक्ष स्व. भाऊ प्रभाकर पाटील हे त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत.

प्रेमलता पाटील यांचा पाटील परिवार खूप मोठा असून बहिरीचा पाडा, रांजणखार या गावात त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांचे मागे त्यांचे पती, मुले, सूना, दिर, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांचे अंत्ययात्रे वेळी मा.श्री. आस्वाद पाटील, मा.सौ. भावना ताई पाटील, मा.सौ. कुंदा ताई गावंड, मा.सौ. राजश्री पाटील, मा.श्री. प्रकाश पाटील, सत्यविजय पाटील, सुभाष पाटील, ग्रामसेवक वारे, निवृत फौजदार जे.व्ही. पाटील, सिध्दनाथ पाटील, कमलाकर पाटील, सुनील म्हात्रे, ग्राम सेवक दीनानाथ पाटील, श्री. भरत पाटील, गुरुनाथ पाटील अशी अनेक सामाजिक शेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शेवटी श्रद्धांजली वाहण्यात येऊन विधीकार्य आटोपण्यात आले. त्यांचं तेरावं त्यांच्या श्री विठ्ठल मंदिर निवास स्थानी दि. 28 रोजी होणार आहे.

Exit mobile version