शेकापने उतरविला डोक्यावरचा हंडा

वालवटी येथे राष्ट्रीय पेय जल योजनेचे लोकापर्ण
| आगरदांडा | वार्ताहर |
उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील वालवटी या गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा होण्यासाठी राष्ट्रीय पेय जल योजनेंतर्गत सुमारे 75 लाख रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना पूर्ण करून या योजनेचा प्रारंभ माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत, उसरोली ग्रामपंचायत सरपंच मनीष नांदगावकर, जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार, वालवटी मुस्लिम समाज अध्यक्ष सिराज बोदले कुतुबुद्दीन उलडे, शबीर खतीब, सिकंदर उलडे, मौलाना मलीक, मुन्नावर घलटे, रमेश घरत, मनोज पाटील, शॉकत नाखवाजी, दिनेश वाघमारे, उपसरपंच महेश पाटील, निस्सार नाखवाजी, अजित कासार, मनोहर बैले, विजय गिदी, माजी सभापती चंद्रकांत कमाने, सी.एम. ठाकूर, बाबू नागावकर, तुकाराम पाटील, राहील कडू, शरद चवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी तालुका चिटणीस मनोज भगत, उसरोली सरपंच मनीष नांदगावकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सरपंच नांदगावकर यांनी येथील विहिरीला संरक्षक भिंत 15 वा वित्त आयोगामधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी असंख्य ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

जनतेचा पैसे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम शेतकरी कामगार पक्ष करीत आहे. रायगड जिल्हा परिषदने पाणी पुरवठ्याचे काम उत्कृष्ठ केल्याने आज रायगड जिल्ह्यात पाणी टंचाई नाही आहे.वालवटी येथील ग्रामस्थांची मागणी होती त्यांना पाणी मिळावे यासाठी आम्ही शब्द दिला होता तो आज पूर्ण होत आहे.लोकांनी काम करणार्‍या सोबत रहावे.

पंडित पाटील, माजी आमदार
Exit mobile version