व्यावसायिकांच्या मागे शेकाप उभा राहीलः आ. जयंत पाटील

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा तालुक्यातील पाभरे येथील मुसद्दीक इनामदार यांच्या वॉटर पुरीफिकेशन प्लॅन्टचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शिवसेना नेते अनंत गिते, संपर्क प्रमुख संजय कदम, माजी आ. मुश्ताक अंतुले, रायगड जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आर.सी. घरत, मुस्लिम समाज अध्यक्ष नाजीम चोगले आदि मान्यवर उपस्थित होते.

मुसद्दीक इनामदार एक तरुण व्यावसाईक आहेत. त्यांना कोणती अडचण असेल तर शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या मागे ठाम उभा आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले. स्थानिक व्यावसायिक पुढे आला पाहिजे. स्थानिक व्यावसायिकांना पुढे आणणे हे सर्वांचीच जबाबदारी असून त्याच्या मागे आम्ही सदैव उभे राहू, असे शरद पवार म्हणाले.

Exit mobile version