आगरी युवकांचा समाज एकीकरणाचा नारा

। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील मुंबईस्थित आगरी युवा संघटनेचा पाचवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित आगरी युवकांनी समाज एकीकरणाचा नारा दिला आहे.
आगरी युवा संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त गुणगौरव आणि मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष चौलकर, सुनील नाक्ती, चंद्रकांत नाक्ती, संगीता नाक्ती, शैलेंद्र चौलकर, उपेंद्र पाटील, संदेश पाटील, दिनेश पयेर, निशित गायकर, संतोष कांबळे, नीलेश गानेकर, मंगेश बिराडी, मंगेश कांबळे, कृष्णा बिराडी, राजा पाटील, संकेश बिराडी, नितेश नाक्ती, रोहित खानलोस्कर, अनिल नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण नाक्ती यांच्या अध्यक्षेतखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन उमेश नाईक यांनी केले. यानंतर धनंजय चौलकर यांनी संघटनेच्या कारकीर्दीची माहिती दिली.
याशिवाय श्रीवर्धन तालुक्यातील सहकार्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश नाक्ती यांनी प्रतिकुल परिस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, रोजगार, करिअर, आगरी समाज बळकटीकरण, युवा परिवर्तन, आगरी संस्कृतीकरण, आगरी महिला लघुद्योग, महिला सक्षमीकरण, आगरी महिला एकीकरण अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

Exit mobile version