| नागोठणे | वार्ताहर |
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) विरोधात दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या नागोठणे शहर व विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी (दि.11) नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करुन निकालाविरोधात निषेध नोंदविला. तसेच उध्दव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी संजय भोसले, प्रमुख संजय महाडिक, मोहन नागोठणेकर, विठोबा दंत, रवींद म्हात्रे, अजित दळवी, संजय काकडे, ज्ञानेश्वर साळुंके, प्रकार कांबळे, मजित लंबाते, प्रशांत भोईर, धनंजय जगताप, अनिल महाडिक, हुसेन पठाण, गणपत म्हात्रे, किशोर नावळे, चंद्रकांत दुर्गावले, एकनाथ दळवी, महिला आघाडीच्या दिप्ती दुर्गावले, प्रणिता पत्की, नागोठणे ग्रा.पं. सदस्या अमृता महाडिक, ज्योती राऊत आदींसह कार्यकर्ते यावेळी बहुसंख्यने उपस्थित होते.







