दिव्यांगांना लघु उद्योगाची संधी

| पनवेल | वार्ताहर |

डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळा नवीन पनवेल येथे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्रेया जाधव यांच्या संकल्पनेतून इको फ्रेंडली ”पेपर ज्वेलरी” बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

वजनाने हलक्या व नाविन्यपूर्ण अशा दीर्घा क्रिएशनच्या दागिन्यांना खूप मागणी आहे. श्रीमती प्राजक्ता दळवी (दीर्घा क्रिएशन) यांनी विद्यार्थ्यांना बनवता येतील अशा सोप्या व वैविध्यपूर्ण ज्वेलरी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. नवीन कलाप्रकार शिकण्याचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या आधारे व्यवसायाच्या नवीन संधीचे दालन खुले झाले. अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या नव्या वाटा मिळतील अशी प्रतिक्रिया समाजातून येत आहे. शाळेच्या या कार्याचे पालक व शाळेचे हितचिंतक यांच्याकडून कौतुक होत आहे.

Exit mobile version