गुढी लहान, आनंद महान पर्यावरणपूरक गुढ्यांना मागणी

। माणगाव । प्रतिनिधी ।
हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजर्‍या होणार्‍या गुढीपाडव्याचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस महाराष्ट्रासह देशभरात विविध पद्धतीने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नव उपक्रमांची सुरुवात, चांगल्याची सुरुवात या दिवशी केली जाते.

महाराष्ट्रात सर्वत्र हा दिवस घरासमोर गुढी उभारून साजरा केला जातो. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कोकणात सर्वत्र या दिवशी बांबू किंवा तत्सम उंच गाठीचा आधार घेऊन गुढी उभारली जाते. महाराष्ट्रात सर्वत्र हा दिवस घरासमोर गुढी उभारून साजरा केला जातो. दाढी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी मोठ्या प्रमाणात बांबू , लाकूड तोड होत असते. यामुळे पर्यावरणाची हानी होते.

त्यामुळे पर्यावरणपूरक गुढी उभारली जावे, या विचाराने पर्यावरणपूरक गुढ्यांना मागणी वाढली आहे. पर्यावरणपूरक गुढ्या या उंचीने लहान असून, अगदी कमी जागेत घरात, कार्यालयात टेबलावर किंवा हॉलमध्येसुद्धा उभारल्या जाऊ शकतात. सुक्या लाकडापासून त्या बनविल्या जातात. दोन ते चार फूट या उंचीची ही गुढी असते. गुढ्यांवर लहान असा गडू, रेशमी कापड, एका ठोकळ्याचा आधार घेऊन त्यावर उभी केलेली लहान काठी व त्यावर लहान फुलांची माळ असते. अतिशय सुंदर व आकर्षक दिसणार्‍या या गुढ्या बाजारात सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.200 रुपयांपासून त्या विक्री केल्या जात आहेत. पर्यावरण वाचविण्याचा संदेश व गुढीचा आनंद देणार्‍या या गुढ्यांना चांगली मागणी असून, त्यातील सुंदरतेची भाव लक्षात घेऊन गुढीप्रेमी खास गृह सजावट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या गुढ्या विकत घेत आहेत.

या गुढ्यांतून लाकडाची, कपड्याची बचत होते. दिसायला सुंदर आहेत. काठीला रंगकाम केलेले आहे. तसेच कमी जागेत उभारता येते. खिडकीत, टेबलावर उभारता येते. या गुढ्या पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत. सुक्या लाकडापासून बनविल्या असून, अगदी लहान आकारामुळे हातळणीस सोप्या व सुलभ आहेत.200 रुपयांना ही गुढी विकली जाते.गुढी प्रेमींनी याला चांगला प्रतिसाद दिला असून चांगली विक्री होत आहे. – नरेंद्र पेणकर, लहान गुढी विक्रेता.

गुढी उभारणीसाठी बांबू किंवा तत्सम लाकूड लागते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. मात्र, सध्या आकाराने लहान गुढीचा पर्याय उपलब्ध झाला असून, या गुढ्या हाताळणी करण्यास व उभारणीस सहज सोप्या, दिसायला आकर्षक अशा आहेत. – दीपक ठाकूर, गुढीप्रेमी

Exit mobile version