बस प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ नागरिकांना एसटी मध्ये प्रवासासाठी सवलक स्मार्टकार्ड प्राप्त करून घेण्यासाठी देण्यात आलेली मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत असून 1 ऑक्टोबर 2021 पासून ज्येष्ठ नागरिकांना एसटी सवलत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्ड प्राप्त करुन घेण्यासाठी यापुर्वी कोरोना संसर्गामुळे 31 मार्च 2021 पर्यंत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोरोना विषाणु महामारीच्या पार्श्‍वभुमीवर अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्या संबंधितीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्यामुळे सदर योजनेला 30 सप्टेंबर 21 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही मुदत संपत असून 1 ऑक्टोबर पासून ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात येत आहे . तरी ज्येष्ठ नागरिकांनी याची नोंंद घ्यावी, असे

Exit mobile version