। अलिबाग । वार्ताहर ।
शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील राज्यस्तरीय अष्टपैलू साहित्य भूषण पुरस्कार उपक्रमशील संस्था मुंबईतर्फे दिला जातो. यंदा हा पुरस्कार स्मिता गणेश पाटील यांना मिळाला आहे. स्मिता पाटील या भारतीय साहित्यिक व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी ऑफ इंडिया (रायगड) मध्ये चार वर्षे जिल्हाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. साहित्यिक कार्यासोबत त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्यही खूप उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यातील योगदान बघून त्यांना आतापर्यंत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, ग्लोबल महाराष्ट्र आयकॉन, राष्ट्रपिता महात्मा फुले समाजभूषण, अष्टपैलू काव्य भूषण, जागतिक संसद आंतरराष्ट्रीय, कोविड योद्धा असे पुरस्कार मिळाले आहेत.