। खोपोली । प्रतिनिधी ।
रूग्णालयातील जैविक कचर्याची विल्हेवाट लावणारा एसएमएसएन नावाचा कारखाना आत्करगांव येथे येेेेवू घातला असून जैविक कचर्यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे हा कारखाना सुरू होवू यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत पहिली जनसुनावणी रद्द करण्यात आली होती. परंतु परत दि.17 नोव्हेंबर रोजी खोपोली, खालापूर येथे जनसुनावणी लावली आहे. ही सुनावणी पंचक्रोशी विभागातील नागरिकांच्या मते बेकायदेशीर असल्याचे निवेदनपत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच आ.जयंत पाटील, खा.सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले असून. खालापूर तालुक्यातील आत्करगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागा एस.एम.एस.एन. ओल्वीन प्रा.लि.कंपनी जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत. यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला घेतला होता. सदर जागेपासून 200 मी अंतरावर गाव, नदी तसेच पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, बौद्धवाडा, जंगमवाडी ही गावे आहेत. जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्यामुळे हवा दुषित होवून दुर्गधी पसरले, तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होऊन पाणी योजना दुषित होत साथीचे आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध दर्शविताच दि.13 ऑगस्ट रोजीची जनसुनाणी रद्द करण्यात आली. परंतु पुन्हा दि.17 नोव्हेंबर जनसुनावणी जाहिर होताच राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शिवाजी पाटील, शेकाप खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील, माजी सदस्य चंद्रकांत देशमुख, सदस्य समीर देशमुख, मनोहर शिंदे, वसंत पाटील यांनी आक्रामक पवित्रा घेत जिल्हाधिकारी, खासदार स्थानिक आमदार, तहसिलदार खालापूर, गटविकास अधिकारी खालापूर यांना पत्र व्यवहार करीत 17 नोव्हेंबर रोजीची जनसुनावणी बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
एसएमएसएन ओल्वीन कंपनीची पुन्हा जनसुनावणी
