जेएनपीटीत चिनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी

1200 ड्रोनचा साठा जप्त
। उरण । वार्ताहर ।
उरण – जेएनपीटी बंदरातुन रक्तचंदनानंतर आता चीनच्या बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे. न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटच्या अधिकार्‍यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेले 1200 ड्रोनच्या साठा एका 40 फुटी कंटेनरमधुन ताब्यात घेतल. तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही डीआरआयच्या विभागाने 36 ड्रोनचा साठा जप्त केला होता.
खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरच बंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा साठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या 1200 ड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावणे पाच कोटींच्या घरात आहे. याआधीही जेएनपीटी बंदरातुन चीनमधुन आयात करण्यात आलेल्या 14.11 लाख किमतीचा 36 ड्रोनचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

सांकेतिक नावे
देशात आयातीवर बंदी घालण्यात आलेल्या या चीनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी करण्यासाठी तस्करांनी न्हावा शेवा असे सांकेतिक नाव दिले आहे. याच सांकेतिक नावाने या ड्रोनची तस्करी केली जात असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version