मोठी कारवाई! जेएनपीए बंदरातून 2 कोटी रुपयांच्या मोरपिसांची तस्करी

| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीए बंदरातून मोरपिसांच्या तस्करीचे प्रकरण उघड झाले आहे. यावेळी तब्बल 2 कोटी रुपयांच्या मोरपिसांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. महसूल सक्तवसुली संचालनालयाने ही मोठी कारवाई केली आहे.

महसूल गुप्तचर संचलनालय विभागाकडून 28 लाख मोरपीस जप्त केले आहेत. जेएनपीए बंदरातून ही मोरपिसांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. 2 कोटी रुपयांचे मोरपीस चीनला अनधिकृतरित्या पाठवले जात असल्याची माहिती मिळाली आहे. पायपुसणीच्या नावाखाली ही तस्करी सुरु असल्याचे तपासाअंती उघड झाले.

महसूल गुप्तचर संचलनालयाच्या पथकाकडे ही माहिती मिळताच त्यांनी चीनकडे पाठवण्यात येणारी मोरपिसांची तस्करी रोखली आहे. या पथकाने एकूण 28 लाख मोरपीस जप्त केले आहे. या प्रकरणात पथकाने निर्यातदाराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

गेले काही दिवसांपासून ही कारवाई सुरू होती. त्यामध्ये मोरपिसांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. परंतु बाजारातही काही तरुण हातात मोरपिसे घेऊन त्याची खुलेआम विक्री करीत असल्याचे दिसते. मग त्यांच्यावर कारवाई कधी होणार, या तस्करीमध्ये त्यांचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

यापुर्वी देखील जेएनपीए बंदरातून रक्तचंदन, सोने, चरस, गांजा, हत्यारे याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे याबाबत बंदर प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version