| मुंबई | वृत्तसंस्था |
श्रीलंकेतून मुंबई विमातळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीकडून सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाने तीन किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 1 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी कलाम उद्दीन (28) याला अटक करण्यात आली आहे.
श्रीलंकेतून मुंबईत सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने ते विमान मुंबईत दाखल झाल्यावर अधिकाऱ्यांनी प्रवाशांवर पाळत ठेवली. एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या सामानामध्ये हे सोने आढळून आले.