स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगडची कामगिरी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून तिची विक्री करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या तिघाजनाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघेही मुरुड तालुक्यातील आहेत. दिनांक १०/०१/२०२२ रोजी ता.मुरूड येथीलमौजे काशिद गावचे नाक्यावर तीन इसम त्यांचेकडील दोन मोटार सायकलवरून, शासनाने बाळगण्यास तसेच खरेदी व विक्रीकरीता बंदी घातलेली व्हेल माशाची उल्टी हा पदार्थ विक्री करीता घेवून येणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस नाईक अक्षय जाधव यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रिशीर बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक शअशोक दुधे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली छापाकारवाई करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक, पवनकुमार ठाकुर व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले.
नमूद पथकाने मिळालेल्या गोपनिय बातमीदारामार्फत सविस्तर माहीती काढुन मुरुड तालुक्यातील मौजे काशिद गावचे अलिबाग मुरूड रोड वरील सद्गुरू कृपा गेस्ट हाउस समोर छापा टाकला असता इसम नामे १) दर्पण रमेश गुंड, वय ३९ वर्षे, रा. मजगाव, ता.मुरूड, जि. रायगड, २) नंदकुमार खंडु थोरवे वय ४१ वर्षे, रा. नांदगाव, ता. मुरूड, जि.रायगड व ३) राजेंद्र जनार्दन ठाकुर, वय ५० वर्षे, रा. मजगाव, ता.मुरूड, जि.रायगड यांच्या ताबे कब्जात ५ किलो ग्रॅम वजनाचा व्हेल माशाची उलटी तपकिरी रंगाचे साधारण ओलसर व सुंगधीत पदार्थ व दोन मोटार सायकल असा एकुण ५ कोटी ९० हजार /- रूपये किंमतीचा मुद्देमालासह ताब्यात घेवुन यशस्वीरित्या छापा कारवाई करण्यात आली नमुद इसमांविरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायदया अंतर्गत मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी स्था. गु.अ. शाखा, रायगड पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पवनकुमार ठाकुर, पो.ह. बंधु चिमटे, पो.ह. / हणमंत सुर्यवंशी, पो.ना. / अक्षय जाधव, पो.कॉ. / ईश्वर लांबोटे यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आले.